जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिवसेना शिंदे गटाच्या महानगर समन्वयकपदी सोहम विसपुते आणि राहुल नेतलेकर यांची निवड करण्यात आली आहे.
अजिंठा विश्राम गृह येथे पाणीपुरवठा तथा पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना महानगर समन्वयकपदी सोहम विसपुते व राहुल नेतलेकर याना नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रसंगी उपस्थित सभागृह नेते ललित कोल्हे, महिला संपर्क प्रमुख सरिता कोल्हे, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक दिलीप पोकळे, युवासेना महानगर प्रमुख हर्षल मावळे, गजानन देशमुख, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.