जळगाव– कोरोना विषाणूच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय हे तातडीच्या उपाययोजनासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. पुढील आदेश होईपर्यंत हे रुग्णालय अधिग्रहित राहणार आहे.शाहू महाराज रुग्णालयात दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत. रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश बंद करण्यात यावात. रुग्णांना चहा, नाश्ता व जेवण देण्याची व्यवस्था करावी.