पाचोरा ;-कोरोनाच्या पार्शवभूमीवर तालुक्यातील सामनेर येथे काही तरुण मंडळींनी एकत्र येत सामनेर बायपास स्टॉपवर स्वखर्चाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझर करून मगच प्रवेश देत असल्याचा चांगला उपक्रम येथील तरुणाई राबवित असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमात रविंद्र(बबलू) वि.पाटील,जितेंद्र बाळू पा. मुरलीधर, मुकेश मोरे,संदीप, गोंडू, दगळू, सोनू,प्रविण, लालू,चेतन,संदीप,सुनील,छोटू, किरण आदींनी आपला सहभाग घेतला आहे.