फिटनेस कॅम्प, क्विझ, ३ॄ मॉडेल मेकिंग, ‘फिजिओ शार्क टँक ’सह रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगाव, ( प्रतिनिधी ) :- डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त विविध शैक्षणिक, क्रीडा, सर्जनशील व सामाजिक उपक्रमांनी फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
सप्ताहाचे उद्घाटन ३ सप्टेंबर रोजी करण्यात आले. भुसावळ आरटीओ येथे फिटनेस कॅम्प व फिटनेस असेसमेंट मधुन पोलीसांना विविध फिटनेस चाचण्या घेऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. समन्वयक डॉ. अमित जायस्वाल, डॉ. प्रियांका गुमनानी व डॉ. सचिन होते. ४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “अॅनाटॉमी अटॅक’, ‘बायोमेकॅनिक्स बॅटल’, ‘म्नेमोनिक मास्टर्स’, ‘लॉजिक लीग’ आणि ‘एंटरटेनमेंट एक्सप्रेस’अशा विविध रंजक फेर्यांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला व कल्पकतेला चालना देण्यात आली. डॉ. चित्रा, डॉ. दीक्षिता, डॉ. अनुराग, डॉ. वैष्णवी, डॉ. ऋतुजा व डॉ. सचिन यांनी स्पर्धेचे समन्वयन केले.५ सप्टेंबर रोजी ३ॄ मॉडेल मेकिंग स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले. फिजिओथेरपी व आरोग्यविषयक विविध संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक त्रिमितीय मॉडेल सादर केले. डॉ. अश्विनी, डॉ. रिया, डॉ. आशिष, डॉ. तेजल, डॉ. धृवी व डॉ. मनोज यांनी समन्वयन केले.७ सप्टेंबर रोजी ङ्गफिजिओ शार्क टँक २०२६’ या जाहिरात निर्मिती व नाविन्यपूर्ण सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपीशी संबंधित विविध संकल्पना प्रभावी जाहिरातींच्या माध्यमातून मांडल्या. डॉ. पायल, डॉ. नेहा, डॉ. सेजल व डॉ. सोनिया यांनी समन्वयाची भूमिका बजावली. सप्ताहाची सांगता वेबिनार व रक्तदान शिबिराने करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पवन, डॉ. वैष्णवी तसेच विद्यार्थी परिषद सदस्यांनी या उपक्रमाचे समन्वयन केले.यावेळी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल पुष्पगुच्छ व कौतुकपत्र देऊन गौरव करण्यात आला.











