• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

पाय घसरून पडून घडली दुर्घटना

जळगाव (प्रतिनिधी):- जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध गोद्री पर्यटन स्थळावर पावसाळ्यात फिरण्यासाठी आणि धबधब्यात पोहण्यासाठी आलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. धबधब्याच्या उंचावरून पाय घसरून खाली पडल्याने २५ वर्षीय तरुणाचा गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. आकाश सुनील पडघान (वय २५, रा. भादोला, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आकाश हा आपल्या महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता आणि तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. बुलढाणा येथून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदरी येथील धबधब्यावर मंगळवारी आकाश हा आपल्या ५ ते ६ मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास धबधब्याच्या परिसरात पोहण्याचा आणि पाऊस-पाण्याचा आनंद घेत असताना, अचानक आकाशचा पाय घसरला आणि तो उंचावरून खोल दरीत कोसळला.

या भीषण अपघातात त्याच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर घाबरलेल्या मित्रांनी अत्यंत धैर्याने त्याला सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत उचलून बाहेर आणले. वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला जवळच्या फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

फत्तेपूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्याचा सल्ला दिला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याला जळगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

आपल्या डोळ्यांदेखत मित्राचा झालेला दुर्दैवी अंत पाहून सोबत आलेल्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचून पंचनाम्याची प्रक्रिया केली. मृत आकाशच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. घरातील एकुलता एक तरुण मुलगा अचानक गमावल्यामुळे पडघान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, भादोला परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: godri-dhabdhabyavar-ek-mrutu
Previous Post

नाल्यात आंघोळीस गेलेल्या तरुणांचे चार मोबाईल चोरीला

Next Post

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जैन कंपनी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
1xbet russia

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जैन कंपनी

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

August 4, 2026
गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू
1xbet russia

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

August 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

August 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!