• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी पेलले आव्हान

जळगाव (प्रतिनिधी):- हृदयविकाराचा त्रास असलेल्या २२ वर्षीय गर्भवती महिलेची अतिजोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ, मेडिसीन विभाग तसेच बालरोग तज्ज्ञ यांच्या समन्वयातून आई आणि बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की, वरणगाव येथील निकीता नामक २२ वर्षीय महिला दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रसूतीसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र तिला यापूर्वीपासूनच हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याने तिची प्रसूती अतिजोखमीची मानली जात होती. गर्भधारणेदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येत असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तिची तपासणी केली. तसेच विशेष दक्षता घेत तातडीने हृदयविकार तज्ज्ञ आणि मेडिसीन तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेची विविध तपासण्या करून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रसूतीदरम्यान हृदयाची गती, रक्तदाब आणि ऑक्सिजनचे प्रमाण सतत तपासण्यात आले. अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. संस्कृती भिरूड, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे या टीमने ही अतिजोखमीची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली. प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले. नवजात शिशुलाही आवश्यक उपचार आणि निरीक्षणासाठी बालरोग विभागात दाखल करण्यात आले. सध्या आई आणि बाळाची प्रकृती समाधानकारक आहे.

हृदयविकार असलेल्या गर्भवती महिलांची प्रसूती ही नेहमीच मोठे आव्हान असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर ताण वाढण्याचा धोका असतो. मात्र सर्व विभागांच्या समन्वयातून आणि योग्य नियोजनामुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. वेळेवर उपचार आणि सतत निरीक्षण यामुळे आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवणे शक्य झाले. – डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

Next Post

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती
1xbet russia

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!