• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

शेतीकाम करताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू; दहिगाव परिसरात हळहळ

जामनेर ( प्रतिनिधी ) – जवळच असलेल्या दहिगाव येथे शेतीकाम करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार, २३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. योगेश यशवंत पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, अवघ्या दहा दिवसांवर त्याचा विवाह ठरलेला असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील रहिवासी योगेश पाटील हा बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होता. दुपारच्या सुमारास काम सुरू असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडला. त्यानंतर तो रोटावेटरमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रॅक्टर सुरू अवस्थेतच पुढे जात शेजारील शेतात पोहोचले. शेताजवळ निंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका तरुणाने हा प्रकार पाहताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर बंद केले. त्यानंतर त्याने तातडीने योगेशच्या वडिलांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत योगेशला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

विशेष म्हणजे, मृत योगेश पाटील याचा विवाह येत्या १८ जून रोजी पार पडणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहिगाव गावासह संपूर्ण परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी राजेंद्र यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी व त्यांचे सहकारी करीत आहेत.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

Next Post

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon