• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील जुना आसोदा रोडवरील गजानन नगर भागात एका पोलीस पाटीलाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २७ हजार ०८० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील आडगाव येथील पोलीस पाटील धर्मराज रामदास बाविस्कर (वय ४०) हे सध्या जळगाव शहरातील श्रीराम चौकाजवळ गजानन नगर येथील प्लॉट नंबर १, रूम नंबर ४ मध्ये भाड्याने राहतात. गुरुवार, १४ मे रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले.

चोरट्यांनी बाविस्कर यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये ठेवलेली बॅग शोधून त्यातील ८० हजार ५८० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३१ हजार ५०० रुपयांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २७ हजार ०८० रुपयांचा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून पोबारा केला. शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी ८:०० वाजता बाविस्कर हे घरी परतले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. नितीन गणपुरे आणि शनीपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद माजिद मन्सुरी यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

या संदर्भात धर्मराज बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५(A), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय विनोद खैरे करत आहेत. शहरात एका पोलीस पाटीलाचेच घर फुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे.


 

 

Tags: jalgavat-polic-patlanche-ghari-chori
Previous Post

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

Next Post

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

May 16, 2026
जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  
1xbet russia

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

May 16, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon