चाळीसगाव (प्रतिनिधी):- वामननगर परिसरात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीस लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी मुकेश विजय वाघ (वय ३७, रा. वामननगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रविण प्रकाश कुमावत याने वादातून फिर्यादीच्या डोक्यावर, मांडीवर व शरीरावर लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच झटापटीदरम्यान फिर्यादीचा मोबाईलही फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ही घटना १० मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ. प्रविण जाधव करीत आहेत.









