जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील शिवाजीनगर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी अनिकेत लक्ष्मण सुरवाडे (वय २०, रा. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच “आमचे नाव कुणाला सांगितले तर जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी मोनाल उर्फ मोणा, सुमित जाधव व शुभम चिमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाॅ. ओमप्रकाश सोनी करीत आहेत.









