जळगाव शहरातील जैनाबाद परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील जैनाबाद परिसरामध्ये रविवारी दि. २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सुमारास केवळ पाचशे रुपये न दिल्याच्या कारणातून संशयित आरोपीने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. उपचारादरम्यान या तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


नितीन नाना काळे (वय ३५, रा.जैनाबाद, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ-बहीण यांच्यासह शहरात राहत होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या चार दिवसांपासून सुट्टीच्या कारणाने तो जळगावमध्ये आलेला होता.(केसीएन)रविवारी २२ मार्च रोजी दुपारी जैनाबाद परिसरात तो जात असताना त्याला संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने पाचशे रुपये मागितले. मात्र पाचशे रुपये नाहीत म्हणून त्याने नकार दिला.याचा संशयित आरोपीला राग आला.
त्याने धारदार शास्त्राने नितीन काळे याच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी नितीन काळे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवारी दि. २३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान किरकोळ कारणाने झालेल्या खुनामुळे जळगाव पुन्हा एकदा हादरले असून शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाची नोंद घेण्याचे काम सुरू होते.








