• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे उद्घाटन; गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रत्येकाच्या जीवनात भितीतून संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातून चांगले कार्य कसे करता येईल यासाठी आपले नेतृत्व विकसीत झाले पाहिजे. उपदेशापेक्षा प्रत्यक्ष कार्यावर भर देऊन दुसऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल असे कार्य केले पाहिजे, त्यासाठी सत्याचा आधार असावा. प्रामाणिकता, दुरदर्शीपणासह सक्षम विचाराने निर्भय राहावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात परिवर्तन करताना आत्मविश्वास हवा. ‘आत्मविश्वासच जिंकतो तर त्याला कमकूवत करणारे आयुधे कधीच जिंकत नाही.’ असे प्रेरणादायी विचार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो यांनी व्यक्त केेले.


गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आजपासून ते ३ ऑक्टोबर पर्यंत नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पच्या उद्घानाप्रसंग दामोदर मावोजो बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गिता धरमापाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन झाले.

नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये नेपाळसह, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, झारखंड, हिमाचलप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडीसा, अरूणाचल प्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील युवकांनी सहभाग घेतला आहे.

पुढे बोलताना दामोदर मावोजो म्हणाले की, लोकहित डोळ्यासमोर असले तर चांगले नेतृत्व संघर्षातही फुलते. भवरलालजी जैन यांनी जल, जमिन, जंगल, जन, जानवर यांच्यावर विशेष प्रेम केले. या पाच तत्वांवर विश्वास ठेवला आणि ह्याच तत्वांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविला. आणि जैन हिल्स येथे सुंदर वृक्षवल्लीसह नैसर्गिक संपदा वाढविली. सोबत महात्मा गांधीजींचा विचार युवकांपर्यंत पोहचविण्यारे जागतिक दर्जाचे गांधी तीर्थ साकार केले. महात्मा गांधीजींसोबत महादेवी वर्मा यांच्या जीवनातील एक प्रसंग नेतृत्व आणि देशसेवेची खरी दिशा सांगणारा आहे. बालवयात त्यांनी लिहिलेल्या कवितेला पुरस्कार म्हणून एक पदक मिळाले होते. त्याच काळात महात्मा गांधींची भेट झाल्यावर त्यांनी ते पदक गांधीजींना दाखवले. गांधीजींनी ते पदक देशाच्या कामी येईल असे सांगून स्वतःजवळ ठेवले. नुकताच मिळालेला आपला पहिला पुरस्कार गेला म्हणून महादेवी वर्मा त्या वेळी काहीशा निराश झाल्या; मात्र नंतर त्यांना समजले की त्यांचा पुरस्कार वैयक्तिक अभिमानासाठी नव्हे, तर देशसेवेसाठी वापरला गेला आहे. वर्षांनंतर महादेवी वर्मा पुन्हा गांधीजींना भेटल्या. तोपर्यंत त्या देशातील नामवंत साहित्यिक झाल्या होत्या. त्यांनी बालपणीच्या त्या प्रसंगाची आठवण करून दिली. गांधीजींनी त्यांना सांगितले की, तुम्हाला मिळालेला तो पहिला पुरस्कार देशाच्या कामी आला, यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा कोणता असू शकतो? हा प्रसंग आजच्या तरुण नेतृत्वासाठीही महत्त्वाचा संदेश देतो. यश म्हणजे केवळ स्वतःसाठी मिळवलेली प्रसिद्धी किंवा सन्मान नव्हे; आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि मिळालेल्या संधींचा उपयोग समाज आणि देशाच्या हितासाठी करणे, हाच खऱ्या यशाचा अर्थ आहे असे दामोदर मावजो यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, आपल्या कर्तृत्वाची खरी किंमत केवळ मिळालेल्या सन्मानात नसून त्याचा उपयोग समाजासाठी किती होतो, यात आहे. नेतृत्व म्हणजे केवळ स्वतः पुढे जाणे नव्हे, तर इतरांना सोबत घेऊन समाज आणि देशाला पुढे नेणे होय. ज्ञान, प्रतिभा, संधी आणि यश यांचा उपयोग व्यापक हितासाठी करण्याची वृत्ती तरुणांनी जोपासली पाहिजे. वैयक्तिक यशापेक्षा समाजासाठी केलेले योगदान मोठे असते आणि देशसेवेत आपल्या कर्तृत्वाचा वाटा उचलणे, हाच नेतृत्वाचा खरा अर्थ आहे

गांधी रिसर्च फाउंडेशन संशोधन आणि पारंपरिक ज्ञान समाजोपयोगी बनविण्याचे कार्य करते. जैन इरिगेशनच्या माध्यमातून उद्योग आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम याठिकाणी बघता येतो. या शिबिरात श्रमदान, योग, ध्यान, चर्चा, व्याख्याने, ग्रामभेटी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांतून ‘Head, Heart and Hands’ म्हणजे विचार, भावना आणि कृती या तिन्ही स्तरांवर शिकण्याची संधी मिळणार आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवादातून केवळ उत्तरे नव्हे, तर नवे प्रश्न विचारण्याची क्षमता विकसित करणे, अनुभव समाजापर्यंत पोहोचवणे, छोट्या कृतीतून परिवर्तनाची सुरुवात करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. गीता धरमपाल यांनी सांगितले.

दादा धर्माधिकारी यांच्या विचारानुसार समाजात दोन प्रकारचे ‘चोर’ असतात, दामचोर आणि कामचोर. दामचोर कमी मोबदल्यात अधिक काम करून घेतो, तर कामचोर अधिक मोबदला घेऊन कमी काम करतो. त्यामुळे या दोन्ही प्रवृत्तींपासून दूर राहून प्रामाणिकपणे मेहनत करावी, कष्टाची सवय लावावी आणि आपल्या श्रमातून उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये सहभागी युवा युवतींना केले.

डॉ. अश्विन झाला यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून सत्य अहिंसा ही वैश्वीकस्तरावर कार्य करते. यशस्वी व्यक्तींमध्ये संघर्ष ही सुवर्ण संधी असते. संघर्ष काळात महात्मा गांधीचे विचार महत्त्वाचे ठरतात त्यासाठी स्वत:चा शोध घेणे, समाजातील अनिष्ठ व्यवस्थेचा विरोध करत राहणे आणि नेतृत्व कौशल्य विकसीत करत राहणे व स्वत: इतरांसाठी प्रेरणादायी ठरणे हे नॅशनल लिडरशीप कॅम्पमधून संस्कारीत केले जाते.
शिबिराचा दैनंदिन कार्यक्रम व मार्गदर्शक
शिबिराचा दैनंदिन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आहे. सकाळी ५.३० वाजता उठण्या पासून दिवसाची सुरुवात होईल. योग व ध्यान, दिवसाचा विचार, श्रम संस्कार, प्रार्थना व चरखा सूत कताई यांसारखे उपक्रम आहेत. दुपारी दुसऱ्या सत्रात सामुदायिक गीते, राज्य सादरीकरण, त्यानंतर गट चर्चा, शांतता खेळ व संध्याप्रार्थना यांचा समावेश आहे. संध्याकाळी चर्चा केली जाईल. विविध उपक्रमांमधून एकात्मता, शिस्त व शांततेचा संदेश शिबिरार्थींना दिला जातो. या शिबिरात तुषार गांधी, प्रो. अनिल गुप्ता, डॉ. सुदर्शन अयंगार, हसमुख पटेल, बरुन मित्रा, कल्याण अक्किपेड्डी आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दीपक मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले तर अभिषेक वैष्णव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.


 

 

Tags: https://kesariraj.com/sangharsat-sudha-nirbhay-raha/
Previous Post

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon