यावल ( प्रतिनिधी ) – यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांच्या नमुना क्रमांक ६४ वरील स्वाक्षरीच्या अधिकाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण अंतरिम दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीबाबत निर्माण झालेल्या वादाला तूर्तास न्यायालयीन दिलासा मिळाला आहे.
याबाबत याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली होती. न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर ६ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने अंतरिम आदेश दिल्याचे वृत्त आहे.
न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार, नमुना क्रमांक ६४ वरील देयकांच्या व्यवहारासंदर्भात याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच या प्रकरणात महाराष्ट्र शासनाला नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणामुळे यावल नगरपालिकेतील आर्थिक व प्रशासकीय अधिकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.










