• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

CBI च्या अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी – सुबोधकुमार जयस्वाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी ड्यूटीवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेहराव/गणवेशाबाबत नवीन नियमावली तयार केली आहे. यामुळे आता सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर उपस्थित असताना, कार्यालयात येताना जीन्स,टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील फक्त साडी आणि फॉर्मल शर्ट वापरणे बंधनकारक केलं आहे. सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फॉर्मल कपडे परिधान करुनच कार्यालयात यावे असे आदेश सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत.

सुबोधकुमार जयस्वाल यांनी सीबीआय संचालक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे. सीबीआय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल करुन घेतले आहेत. सहाय्यक संचालक अनूप टी मॅथ्यू यांनी सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मंजुरीनंतर परिपत्रक जारी केले आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांनी नियमावलीत बदल केल्यानंतर आता सीबीआय कार्यालयात येताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज या गणवेशातच येणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता जीन्स, टी-शर्ट,स्पोर्टस शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच पुरुष अधिकाऱ्यांना आपली दाढी वाढवता येणार नाही.

सीबीआय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्याही पेहरावात बदल करण्यात आला आहे. महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी यांना कार्यालयात येताना साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयचे नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल येत्या काळात अनेक नियमांत बदल करणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जयस्वाल यांनी याआधी जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे. जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार, सीबीआयचे नवे प्रमुख म्हणून सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली होती.


 

 

Previous Post

जळगाव येथे १४ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

Next Post

नेरी बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नेरी बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon