• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त – पालकमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2024
in खान्देश, जळगाव
0
युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त – पालकमंत्री

274 सुशिक्षित युवकांना मिळाला आधार ; पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

जळगाव (प्रतिनिधी ) ;- युवकांच्या हाताला काम देऊन त्याला प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार आहे. युवकांना या प्रशिक्षण काळात मिळणारा अनुभव हा त्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यास मदत करणारा ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्या सहकार्याने दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आयोजित ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप व रोजगार मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती आवारात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

274 प्रशिक्षणार्थीना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

यावेळी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थीमधून पंचायत समितीला 208, तहसील कार्यालयात 48, सार्वजनिक बांधकाम विभागात 06, शिक्षण विभागात 91, नगरपालिका – 09, अर्बन बँक 12 या ठिकाणी 6 महिन्याकरिता प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आलेल्या अशा एकूण 274 प्रशिक्षणार्थीना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी ज्या ज्या कंपन्यांना प्रशिक्षणार्थी दिले जाणार आहेत त्या आस्थापनांची स्टॉल्स उभारण्यात आली होती, त्या सर्व स्टॉलची पाहणी पालकमंत्री यांनी केली. तसेच संबंधित स्टॉल्सवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या युवकांशी त्यांनी संवादही साधला.
खाजगी कंपनी आस्थापनांना मिळाले 300 प्रशिक्षणार्थी
औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते. ही गरज ओळखून राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कार्य प्रशिक्षण दिले जाते. ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होणार आहे. जिल्ह्यातील विविध 12 कंपन्यांमध्ये एकूण 584 रिक्त जागी बेरोजगार युवकांना प्रशिक्षणार्थीं म्हणून पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते . पंचायत समितीच्या आवारात मेळाव्याच्या ठिकाणी जैन इरिगेशन, बांभोरी (250), हिताची कंपनी बांभोरी (200), कृ.ऊ.बा. समिती (04), जोगेश्वरी जिनिंग (07), मोहरीर कॉटन भोद खु. (07), एम आय डी सी मधील आशिष व तषविता इलेक्ट्रिकल्स (05), बियाणी , शारदा व विन्ले पोलीमर्स (11), स्टार फेब्रीकेटर्स (06), स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज (04) या कंपन्यांमध्ये एकूण 584 जागा रिक्त आहे. यात आलेल्या युवकांमधून सुमारे 300 युवक व युवती पात्र झाले आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कौशल्य विकास विभागाचे कनिष्ठ अधिकारी मिलिंद देशपांडे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची’ माहिती, रोजगार मेळाव्याचा उद्देश तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया आदींबाबत सविस्तर माहिती विषद केली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मंजुषा अडावतकर यांनी केले तर आभार कार्यक्रमाच्या आयोजक दर्शन इन्स्टिट्यूटच्या संचालिका पौर्णिमा भाटिया यांनी मानले.
या नियुक्ती वाटप व उद्घाटन समारंभास तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर. आर. डोंगरे, आय. टी. आय. चे प्राचार्य नवनीत चव्हाण, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता एस. डी. पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास पाटील यांच्यासह माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, जिजाबराव पाटील , दिलीप महाजन, निर्दोष पवार, चंदन पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, संजय चौधरी, पप्पू भावे ,वाल्मिक पाटील, वासुदेव चौधरी दर्शन इन्स्टिट्यूटच्या संचलिका पौर्णिमा भटिया, समीर भटिया तसेच शासकीय विभागात निवड केलेले प्रशिक्षणार्थी यांच्यासह मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी 10 वी, 12 वी, पदवीधर तसेच उच्चशिक्षित युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


 

 

Previous Post

डोक्यात लोखंडी सळई मारून तरुणाला केले जखमी

Next Post

खानदेशात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हतनूरचे २० दरवाजे उघडले, पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस

खानदेशात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon