यावल ( प्रतिनिधी ) – भारतीय जनतेवर २१ महिन्यात काँग्रेसने आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अत्याचार केले होते, म्हणून २५ जून हा दिवस काळा दिवस म्हणून यावल शेतकरी संघात साजरा करण्यात आला. तत्कालीन आणीबाणीचा निषेध करत यावल येथे तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात भाजपने निषेध सभा आयोजित केली होती. या सभेत मिसा कायद्यांतर्गत चुकीची कारवाई

झाल्याने पीडित नागरिकांचा सत्कार करण्यात आला. निषेध सभेत डॉ. कुंदन फेगडे, पालिकेच्या भाजप गटनेता नंदाताई महाजन, उमाकांत फेगडे, पी. एस. सोनवणे, मुकेश कोळी, बबलू घारू, नगरसेविका कल्पना वाणी, सविता नन्नवरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते









