यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथून एका ३५ वर्षीय तरुणाचे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. महेश सुधाकर मोरे (वय ३५, रा. किनगाव बुद्रुक) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने महेश मोरे यांना काहीतरी आमिष दाखवून फूस लावत सोबत नेल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ते कुठेही आढळून न आल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली.या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र बागुल करीत आहेत.











