यावल ( प्रतिनिधी ) – आता तालुक्यातील ग्रामीण परिसरात डेंग्युचा आजार वेगाने वाढत आहे. नागरीकांसह आरोग्य यंत्रणेला दक्ष राहावे लागणार आहे.
यावल तालुक्यातील हिंगोणा, वड्री, सातोद, कोळवद व आदी गावांमध्ये डेंग्यु रुग्ण मिळुन आले. यात डेंग्युच्या रुग्णांमध्ये लहान मुलांची मोठी संख्या
असल्याने पालक चिंतेत आहेत . ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुनआवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत. सातोद, कोळवद, वड्री, हिंगोणा, डोंगरकठोरा यासह अशा अनेक ग्रामपंचायत पातळीवर गावात स्वच्छता मोहीम योग्य प्रकारे राबविली जात नसुन, जंतुनाशक औषधींची नियमीत फवारणी केली जात नसल्याने डासांचा उपद्रव वाढत आहे. परिस्थिती हाता बाहेर जाईल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे यांनी दखल घेत सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रांना घरोघरी जावुन सर्वक्षण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.