भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- येथील रेल्वे स्टेशन परिसरातील जन आपूर्ति सेंटरजवळ क्रेनमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून १७ वर्षीय अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सखाराम जिना बारेला (वय १७, रा. गंगापूर, जान्हवे, मध्यप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह आणखी ५ मजूर हे जन आपूर्ति सेंटर येथे एक महिन्यांपासून काम करीत होते. शुक्रवारी सकाळी चिखल काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी क्रेनमध्ये विद्युत प्रवाह उतरला. त्याचा सखाराम बारेला याला धक्का बसल्याने तो जागीच मयत झाला. तर इतर मजूर किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.