पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सावखेडा होळ येथे दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना वीज कोसळून पावणे दोन लाख रुपये किमतीची म्हैस मरण पावल्याची घटना घडली.
सावखेडा होळ येथील हिरालाल अशोक पाटील यांची पावणे दोन लाख रुपये किमतीची म्हैस सावखेडा होळ गावाबाहेरील दवाखाण्याजवळ बांधलेली असताना पहाटे पाच वाजता अचानक वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. म्हशीचे शवविच्छेदन करून जमिनीत पुरण्यात आली. शेतकऱ्याने मयत म्हशीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.