वावडदा ता.जळगाव ( प्रतिनिधी ) – आज पहाटेपासून सुरु झालेल्या पावसामुळे वावडदा गावाजवळ वाहतूक ठप्प होऊन पाचोरा आणि वडलीकडे जाणारी वाहने दुपारपर्यंत अडकून पडली होती.
आज सकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जळगाव ते मनमाड महामार्गावरील वावडदाजवळील गलाठी नाल्याच्या पुलाहुन पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक दुपारपर्यंत बंद होती नाल्यावरील पुलाचे काम गेल्या वर्षापासून चालु आहे तरी ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे आठवडाभरात दोन वेळा ही वाहतुक ठप्प झाली आहे पुलाचे काम ८० टक्के पुर्ण झाले आहे.