बाबा महाहंस महाराज यांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) :- आदिवासी हितचिंतक म्हणवून घेणारे वनजमिनींचे हक्क मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवीत आहे. तसेच मोर्चा काढून पुढारीगिरी करीत आहे. वनहक्क दावे सरसकट मंजूर करण्यासाठी दबाव टाकत आहेत. तसेच वनजमिनीवर अतिक्रमणाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी मागणी जंगल बचाव संस्थेचे अध्यक्ष बाबा महाहंस महाराज यांनी केली आहे.
दाखल असलेल्या सर्व पात्र, अपात्र व प्रलंबित दाव्यांमध्ये याप्रमाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामस्तरीय वन हक्क समितीने वनदावेदारांच्या दावे क्षेत्रांची पाहणी केल्याची चित्रीकरणास नोंद आहे किंवा नाही याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या दाव्यांमध्ये वनविभागाचे अधिकारी दावा क्षेत्र पाहणीस उपस्थित असल्याची नोंद नसेल व तसे सचित्र सबळ पुरावे नसतील तर असे सर्व दावे तात्काळ फेटाळण्यात यावेत व मंजूर केलेल्या वन हक्कांची मान्यता सुद्धा अमान्य करण्यात यावी अशीही मागणी बाबा महाहंस महाराजांनी केली आहे.
वन पर्यावरण संरक्षणाला प्रथम प्राधान्य देऊन वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच, वनक्षेत्रावर हक्क भासविणाऱ्या वन दावेदारांविरोधात तत्काळ फसवुणकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, असेही महाराजांनी म्हटले आहे.