• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

यावल, नशिराबाद, जळगाव तालुका आणि भुसावळ पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर, ट्रॉली व पिकअपसह मोठ्या प्रमाणात वाळू जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
यावल, नशिराबाद, जळगाव तालुका आणि भुसावळ पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर, ट्रॉली व पिकअपसह मोठ्या प्रमाणात वाळू जप्त

जळगाव | प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, यावल, नशिराबाद, जळगाव तालुका आणि भुसावळ तालुका पोलिसांनी केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहनांसह सुमारे १७ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये संबंधित वाहनचालक व संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यावलमध्ये ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

यावल पोलिसांनी किनगाव ते डोंणगाव रस्त्यावर इंग्लिश मीडियम स्कूलजवळ सार्वजनिक ठिकाणी कारवाई केली. पोलिसांनी स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर, त्याला जोडलेली नंबरप्लेट नसलेली ट्रॉली आणि त्यामध्ये भरलेली सुमारे एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी नामदेव मुकुंदा सोळंके (वय ३३, रा. कोळन्हावी, ता. यावल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची परवानगी किंवा पास परमिट नसताना वाळूची वाहतूक केल्याचा आरोप आहे.

नशिराबाद पोलिसांची कारवाई; ४ लाख ६ हजारांची वाळू जप्त

नशिराबाद पोलिसांनी शेळगाव येथील तापी नदीपात्राजवळ कारवाई करत चोरीची वाळू साठवून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १ ब्रास वाळू, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि अतिरिक्त साठवलेली वाळू असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सागर पोपट गोसावी, राज पितांबर कोळी, कृष्णा राजू कोळी आणि आकाश राजू कोळी, सर्व रा. शेळगाव, ता. जि. जळगाव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यात दोन स्वतंत्र कारवाया

जळगाव तालुका पोलिसांनी कानळदा ते विदगाव रस्त्यावर एमएसईबी सबस्टेशनजवळ दोन स्वतंत्र कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत सुमारे १ ब्रास वाळू आणि महिंद्रा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे मॅक्स पिकअप वाहन (क्र. एमएच १९-सीएक्स-३८३३) असा एकूण ५ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाहनचालक प्रफुल्ल गुणवंत नेहते (वय ३१, रा. जैनाबाद, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत कानळदा ते विरगाव रस्त्यावर एमएसईबी सबस्टेशनजवळ सुमारे अर्धा ब्रास वाळू आणि महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन (क्र. एमएच ०६-बीजी-३१५७) असा एकूण ४ लाख १२ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यात ४५ हजारांची वाळू चोरी

भुसावळ तालुका पोलिसांनी साकेगाव शिवारातील ग्रामपंचायत हॉलजवळ सार्वजनिक ठिकाणी ठेवलेली सुमारे १५ ब्रास वाळू, किंमत ४५ हजार रुपये, जप्त केली. ही वाळू ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी यापूर्वी जप्त करून फिर्यादीच्या ताब्यात दिलेली होती.

या प्रकरणी संशयित गजानन पंडित जवरे, रा. साकेगाव, याच्याविरुद्ध वाळू चोरी केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची नजर

जिल्ह्यातील विविध भागांत अवैध वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. शासनाची परवानगी किंवा आवश्यक पास नसताना गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेसह संबंधित गौण खनिज व महसूल कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.


 

 

Previous Post

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

Next Post

सावदा शहरातून सहा बकऱ्यांची चोरी; १८ हजारांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सावदा शहरातून सहा बकऱ्यांची चोरी; १८ हजारांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
Uncategorized

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

August 23, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

घराचा दरवाजा तोडण्याच्या कारणावरून वाद; दाम्पत्यासह महिलेवर दगडाने हल्ला

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

जळगाव तालुक्यातील आसोदा येथे जुन्या वादातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

August 23, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon