जळगाव तालुक्यातील आसोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील असोदा येथे तरुणाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेतल्यानंतर बुधवार दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
युवराज सुखदेव कोळी (वय ३७ रा. असोदा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, तीन मुले यांच्यासह राहत होता. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान बुधवारी दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
दरम्यान, कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. सदर घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. घटनेमुळे असोदा गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी आणखी एका तरुणांने आत्महत्या केल्यामुळे गावामध्ये शोकमग्न वातावरण आहे.