चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवशक्ती नगर येथे राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी दि. २२ मे रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्वताबाई सुरेश पाटील (वय-६५, रा. शिवशक्ती नगर, चाळीसगाव) या दि. २२ मे रोजी रात्री ९ वाजता घरी पायी जात असताना अज्ञात दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पर्वताबाई पाटील घरी आल्या. त्यानंतर त्यांनी हा प्रकार त्यांचे पती सुरेश पाटील यांना सांगितला. दोघांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.