महादेव हॉस्पिटलतर्फे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पीटलतर्फे पुढील एक महिना हदयरोग मुक्त जिल्हा अभियाना राबवण्यात येणार असून हदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक व आरोग्य उपक्रमांनी साजरा करण्यात यावा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद महादेव हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुढील एक महीना हदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरात नागरिकांसाठी २ डी इको,ईसीजी, एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी संदर्भात मोफत तपासणी व सल्ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे शिबिर १७ मे ते १७ जून दरम्यान आयोजित करण्यात आले असून सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत तपासणी केली जाणार आहे.या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना हृदयविकाराचे निदान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज उपलब्ध होणार आहे. महादेव हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या शिबिरात सहभागी होत असून आधुनिक वैद्यकीय सुविधांद्वारे रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. शहरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










