शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

पारोळा | प्रतिनिधी
तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील शिवल्या नाल्याला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात २२ वर्षीय युवक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. समाधान चुडामन भील (रा. शेवगे बुद्रुक) असे पुरात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाल्याला अचानक मोठा पूर आल्याने समाधान भील याचा पाण्याच्या प्रवाहात तोल जाऊन तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे.









