• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

 

जळगाव (प्रतिनिधी) – अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत. ‘एमडी’ या घातक अमली पदार्थाची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत ६२.०७ ग्रॅम एमडीसह एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मालेगावच्या एका संशयिताचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १०.४० वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्र. A-14 समोरील रस्त्यावर पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेला ‘एमडी’ हा अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान या कारवाईत पोलिसांनी इम्रान खान हयात खान (वय ३६, मूळ रा. आडगाव, सध्या रा. करीम नगर, फातिमा नगर, एम.आय.डी.सी., जळगाव) याला अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अमली पदार्थ त्याला रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक,) याने विक्रीसाठी उपलब्ध करून दिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रफीक विरुद्धही गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

एमडी ड्रग्ज: ३९.०६ ग्रॅम एमडी (किंमत ₹१,९६,०००), ११ प्लास्टिक पिशव्यांमधील ९.१० ग्रॅम एमडी (किंमत ₹३६,०००) आणि १८ प्लास्टिक पिशव्यांमधील १३.९१ ग्रॅम एमडी (किंमत ₹५६,०००). अशा प्रकारे एकूण ६२.०७ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला असून त्याची बाजारपेठीय किंमत सुमारे २ लाख ८८ हजार रुपये आहे. तर .२० हजार रुपये किमतीचा एक ‘रिअलमी’ कंपनीचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपये किमतीची एक ‘हिरो होंडा स्प्लेंडर’ मोटरसायकल. एकूण जप्त मुद्देमाल: ₹३,५८,०००/- दरम्यान याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६३५/२०२६ अन्वये अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच बी.एन.एस. कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.फौ. अतुल रघुनाथ वंजारी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत.

नागरिकांना जळगाव पोलिसांचे आवाहन

अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला वाचवण्यासाठी जळगाव पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. “अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची करडी नजर असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांनाही आपल्या परिसरात अमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

Next Post

शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या
क्राईम

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon