रावेरबाबत सस्पेन्स कायम


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज दि. ३० मार्च राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली.
यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरबाबत सस्पेन्स कायमच राहिला आहे.









