युवा नेते आदित्य ठाकरे यांचा शिरसोली येथील सभेत घणाघात
जळगाव (प्रतिनिधी) : आपला देश कृषिप्रधान आहे. मात्र शेतकऱ्यांवर अन्याय सुरूच आहे. दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार, अश्रूधूर सोडला जातो आहे. पिकविमाची नुकसान भरपाई मिळत नाही. या निर्दयी सरकारला जनता आता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेनेचे ठाकरे गटाचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला. ते जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील सभेत बोलत होते.
युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या गुरुवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात चार सभा झाल्या. यात शिरसोली येथे त्यांची दुपारी सभा झाली. यावेळी मंचावर संपर्कप्रमुख संजय सावंत, युवा नेते वरुण सरदेसाई, उत्तर महाराष्ट्र सहसंघटक गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, निलेश चौधरी, जयश्री महाजन, जळगाव तालुकाप्रमुख उमेश साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजप हि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच वाढली आहे. महाराष्ट्र हिताचे जो बोलेल तोच इथे टिकेल. राज्यातील गद्दार मंत्र्यांनी आपले इमान विकले आहे. लोक या निर्लज्ज लोकांना आता आगामी निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आगामी पंचवार्षिक निवडणुकीत या सत्ताधारी भ्रष्ट्राचारी लोकांना आपल्याला पाडायचं आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
शिरसोली सभेसाठी विकास पाटील, भाऊसाहेब सोनवणे, विजय लाड, नीरज वाणी, अविनाश पाटील, निलेश बारी, अनिल न्हावी, राहुल धनगर, बबन धनगर, किरण बारी, संजय पाटील, पंढरी पाटिल, बबलू माळी, नाना पाटील, मुकेश पाटील, फकीरा पाटील आदींनी परिश्रम घेतले.