• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृती ही सौंदर्य रसोपासक आहे. त्या उपासनेचे मूळ सूत्र सेवा  हेच आहे.  भारताची जी आध्यात्मिक साधना आहे त्याच सेवेला आपण संस्कृत मध्ये भक्ती असे म्हणतो.  तेच सेवातत्व महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अवलंबले. सेवा परमोधर्म यातच सार्थकता मानले. हेच भगवत गीतेचे सार आहे.

समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा ‘मोहन लीला’ कार्यक्रमाचे आयोजन गांधी तीर्थ कस्तूरबा सभागृह केले होते. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. ‘मनमोहन’ ते ‘मोहनदास’ पर्यंतचा प्रवास त्यांनी सहज सोप्या भाषेत उलगडून दाखविला. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, फाऊंडेशनच्या रिसर्च डीन गीता धरमपाल उपस्थित होते. श्रीवत्स गोस्वामी यांचे स्वागत सूतीहार, महात्मा गांधीजींचा पुतळा, शाल देऊन अशोक जैन यांनी केले.

श्रीवत्स गोस्वामी पुढे म्हणाले की, हिंदूचे तीर्थ हे जलाधिष्ठीत आहेत तर जैनांचे तीर्थ पर्वताधिष्ठीत आहे. गांधी तीर्थ हे मात्र जल आणि पर्वत या दोन्ही मिळून बनलेले आहे.  त्यामुळे ते खूप महत्त्वाचे ठरते. याठिकाणी ज्ञान मिळते आणि ज्ञान असेल तरच सेवा घडते हे मानवतेचे मूळ लक्षण होय. भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी यांच्यातील साम्य दर्शविताना एकादशी, वैष्णव, वैश्य आदींचे संदर्भासहित दाखले दिलेत. प्रकृती साकार करण्यासाठी मानवतेला धरून अन्यायाला विरोध करण्यासाठी महाभारत असो की सत्याग्रह हा धागा श्रीवत्स गोस्वामी यांनी समजून सांगितला. धर्मनिरपेक्षता हा गुण भगवत गीतेतून महात्मा गांधी यांनी स्वत: आचारणात आणला असेही ते म्हणाले. हीच शिकवण गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनीही कर्मातून आचरणात आणली. उजाड माळरानावर सिंचनातून नंदनवन फुलवले. ते स्वर्गाहून कमी नाही. आपल्या दूरदृष्टीतून पाणी, माती निसर्गाची भवरलाल जैन यांनी सेवा केली.

ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लीलांची अनुभूती..

ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लिलांची अनोखी प्रस्तूती नृत्यांगना विष्णुप्रिया गोस्वामी यांनी केली. ओडिसी नृत्यातून श्रीकृष्णाच्या बाललिला, गोकूळ, वृदांवनातील विविध दाखल्यांवर नृत्याभिनय सादरीकरण केले. यात ‘केळ छंद जाने लो नंद राजा राम लिया..’ या उडिया भाषेतील वनमाली रचीत रचनेवर ओडिसी नृत्य सादर केले. ही राग केदारगौड ताल गुरू सात मात्रमध्ये सादर केले. यानंतर ‘राधाराणी सांग नावे मुरलीपारो’  या गीतावर मनमोहक नृत्य केले. शेवटी ‘वैष्णव जन तो है पिर..’ या महात्मा गांधी प्रिय भजन वरूण नेवे याने गायले. त्यावर विष्णुप्रिया गोस्वामी हिने ओडिसी नृत्य प्रस्तूत केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलनानंतर प्रशांत सूर्यवंशी यांनी संत कबीरांची रचना सादर केली. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. आभार गिरीष कुळकर्णी यांनी मानले. राष्ट्रगीताने समारोप झाला.


 

 

Tags: #gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/seva-parmo-dharm-news/
Previous Post

भीषण अपघातात ट्रक खाली चिरडला गेल्याने पुतण्या ठार, काका जखमी

Next Post

विविध कार्यक्रमांनी जळगाव परिमंडलात लाईनमन डे साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विविध कार्यक्रमांनी जळगाव परिमंडलात लाईनमन डे साजरा

विविध कार्यक्रमांनी जळगाव परिमंडलात लाईनमन डे साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon