सावदा ( प्रतिनिधी ) – सावदा नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे . ही घोषणा आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली
येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी विश्रामगृहावर पार पडली यावेळी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली जनतेची कामे आपण जी करीत आहोत ती आमदारांच्या मार्फत होत आहे. त्याची माहिती जनतेपर्यंत शिवसैनिकांनी पोहोचवावी.सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी पालिकेतून नाहरकत दाखले देण्यास टाळाटाळ केली नसती तर आता जेवढा निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला त्यापेक्षा कितीतरी पटीने उपलब्ध करून दिला असता. शिवसेना सार्वजनिक काम करण्यासाठी पुढाकार घेत असते त्या माध्यमातून आपण जनतेची कामे करीत आहोत आगामी निवडणुकीत आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवण्याची असल्याने सर्वांनी स्वबळाची तयारी करावी व सर्व नागरिकांपर्यंत आपण करीत असलेल्या कामाची व शासकीय योजनांची माहिती पुरवावी असे प्रतिपादन यावेळी जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, मिलिंद पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील ,शहर प्रमुख सुरज परदेशी, उपशहरप्रमुख गौरव भैरवा, शहर संघटक नीलेश खाचणे ,शरद भारंबे , युवासेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, गणेश माळी, वेडु लोखंडे , किरण गुरव , नितीन सपकाळे,चेतन माळी व शिवसैनिक उपस्थित होते.