चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहर पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग व रेकॉर्डवरील आरोपी यांचे घरझडती करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत घरात कोयता व सुरासारखे धारदार शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली. संशयित आरोपी समाधान बळीराम निकम (रा. शिव कॉलनी, साठे मंगल कार्यालयामागे, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याने त्याचे घरात कोयता व सुरासारखे धारदार हत्या ठेवलेले आहेत. त्याचे घराची घरझडती घेवुन कारवाई केली असता त्याचे घराचे बैठक रुममधील लोखंडी पलंगाचे बॉक्स मध्ये १ लोखंडी धारदार कोयता व दोन लोखंडी धारदार सुरे असे एकुण ३ धारदार हत्यार मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. सदर संशयित आरोपी समाधान निकम याच्याविरुद्ध पोकॉ आशुतोष सोनवणे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/ राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ/ मनोज चव्हाण यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/ राहुल सोनवणे व पोकॉ/ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.