• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रशियाची अँटीसॅटलाईट मिसाईलची चाचणी यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2021
in भारत
0

रशिया (वृत्तसंस्था) – रशियाने सोमवारी केलेल्या अँटीसॅटलाईट मिसाईल परीक्षणाने जगात एकच हडकंप माजला आहे. या मिसाईलने रशियाने त्यांचाच एक उपग्रह उडविला पण त्यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणावर मलबा पसरला आणि त्याचा थेट धोका आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला होता असे समजते.

आपल्या अँटीसॅटलाईट मिसाईलची चाचणी रशियाने यशस्वी केली असली तरी त्यांच्या या बेजबाबदार वर्तनाने जगात त्यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे.

नासाचे प्रमुख बिल नेल्सन या संदर्भात म्हणाले, रशियाच्या या चाचणी दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील ७ अंतराळवीरांना या स्टेशनला लागून असलेल्या अंतराळ यानात दोन तास राहावे लागले. कारण अंतराळ स्थानक पृथ्वीच्या वर ४०२ किमी असून रशियाने जेथे त्यांच्या उपग्रहावर अँटीसॅटलाईट मिसाईलचा मारा केला तेथून दर ९० मिनिटांनी हे स्थानक फेरी मारत असते. त्यामुळे अंतराळवीरांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना स्टेशनच्या आंत असलेल्या कॅप्सूल मध्ये जाण्यास सांगण्यात आले होते.रशियाच्या या चाचणीने अंतराळ कक्षेत मोठा मलबा पसरला असून पुढेही त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण या कक्षेत फिरत असलेले अन्य उपग्रह आणि मलबा यात टक्कर होऊ शकते. रशियाच्या उपग्रहाचे किमान १५०० तुकडे झाले असून त्यामुळे ढग निर्माण झाले आहेत. या तुकड्यांची अन्य वस्तूंशी टक्कर झाली तर चेन रिअॅक्शन होऊन पृध्वी कक्षेत उलथापालथ होऊ शकते असे नासाचे म्हणणे आहे.

आजच्या युगात जगातील सर्व बडे देश सैन्या सह नागरी गरजा सेवांसाठी पूर्णपणे उपग्रहांवर अवलंबून आहेत. जगातल्या बड्या देशांमध्ये तर स्पर्धा निर्माण झाली असून युध्द परिस्थिती आलीच तर शत्रू देशाचे उपग्रह नष्ट करून त्यांचे संदेश दळणवळण पूर्णपणे कसे बंद पाडता येईल यासाठी अँटीसॅटलाईट मिसाईल चांचण्या केल्या जात आहेत. मात्र अजून कुठल्या देशाने शत्रूविरुद्ध या तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही.

अमेरीकेबरोबर रशिया, चीन आणि भारताने अँटीसॅटलाईट मिसाईलची यशस्वी परीक्षणे केली आहेत. अमेरिकेने ५० वर्षापूर्वीच अशी परीक्षणे केली होती. भारताने २०१९ मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेल्या उपग्रहावर अशी चाचणी केली होती आणि ती यशस्वी झाली होती. अमेरिकेची सेना जगात आधुनिक मानली जाते. तिची सर्व ऑपरेशन्स उपग्रहांच्या माध्यमातून होतात. हे उपग्रह नष्ट झाले तर बँकिंग आणि जीपीएसवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.


 

 

Previous Post

भिक्षुकीवर गुजराण ; तरीही अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी !

Next Post

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon