• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

तरुण तडफदार उमेदवार महायुतीतर्फे, भाजपकडून मास्टर स्ट्रोकची शक्यता

जळगाव प्रतिनिधी – सध्या महाराष्ट्र मध्ये विधान परिषदेची निवडणूक लागली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून १ जागा निश्चित झाली आहे. यासाठी महायुतीमध्ये आता विविध नावांची चर्चा सुरू झाली असून या निवडणुकीच्या निमित्ताने गुलाबराव विरुद्ध गुलाबराव हा सामना पुन्हा रंगणार असल्याची चर्चा रंगत आहे. ऐन वेळेला भाजपकडून मास्टरस्ट्रोक दिला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रमध्ये नऊ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातून एक जागा आहे. या जागेसाठी सध्या भाजपमधून पाचोरा येथील अमोल शिंदे, रावेर तालुक्यातील नंदकिशोर महाजन, जळगावचे उद्योजक नंदकुमार आडवाणी यासह शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. मात्र दुसरीकडे आता गुलाबराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे गुलाबराव देवकर यांचे घराणे देखील मैदानात उतरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

देवकर परिवारातून विशाल देवकर हे निवडणुकीच्या रिंगणात येण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय क्षेत्रामध्ये तर्क वितर्कला उधाण आले आहे. मराठा समाजाचे प्रबळ उमेदवार विशाल देवकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसेच प्रतापराव पाटील यांना उमेदवारी दिली तर महायुतीतील काही विरोधकही देवकर यांना मदत करण्याची शक्यता आहे. महायुतीमधील काही अंतर्गत विरोधक हे विशाल देवकर यांना मदत करू शकतात तर दुसरीकडे ऐन वेळेला भारतीय जनता पक्षाकडून मास्टरस्ट्रोक वापरला जाऊन विशाल देवकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे सर्वपक्षीय मित्र आहेत. हे सर्वपक्षीय मित्र विशाल देवकर यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये मदत करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपतर्फे विशाल देवकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा घडून येत आहे.

विधान परिषदेसाठी मतदान आणि निकाल कधी?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १२ मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक सुद्धा १२ मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत होता. दरम्यान, ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता आहे.


 

 

Previous Post

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

Next Post

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon