• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून ‘महिला सशक्‍तीकरण’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – नवीन कोऱ्या ‘लिंक हॉफमन बुश’ (एलएचबी) कोचने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी डेक्‍कन एक्‍स्प्रेसची धुरा महिलांनी यशस्वीरित्या सांभाळली. निमित्त होते, मध्य रेल्वेमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या ‘महिला सशक्‍तीकरण’ सप्ताहाचे.सर्वच क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या महिला भारतातील सर्वात मोठी प्रवासी यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेची जबाबदारी सांभाळण्यात मागे नाहीत. आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त गुरुवारी पुणे-मुंबई धावणाऱ्या डेक्‍कन एक्‍स्प्रेसची धुरा महिलांकडे सोपवली. ही गाडी नियोजित वेळेनुसार दुपारी 3.15 वाजता सुटली. याचे सारथ्य श्रद्धा तांबे, तर गार्ड म्हणून राधा चलवादी यांनी काम पाहीले. याशिवाय, या गाडीमध्ये तिकीट तपासणीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी कार्यरत होत्या.
एक्‍स्प्रेसला पुणे विभागाच्या पहिल्या महिला विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीलम चंद्रा यासह महिला कर्मचाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, विभागीय सुरक्षा आयुक्‍त अरूण त्रिपाठी, स्टेशन निर्देशक संजय कुमार आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी महिला प्रवाशांना गुलाब पुष्प देत संवाद साधला.
मी रोज डेक्‍कन एक्‍स्प्रेसने पुणे ते लोणावळा मार्गावर प्रवास करते. एक्‍स्प्रेस एलएचबी कोचची रचना करणाऱ्यांना प्रवाशांच्या वतीने धन्यवाद देणे आवश्‍यक आहे. यामुळे आम्हाला भरपूर जागा उपलब्ध होणार आहे. कोचची प्रशस्त रचना, चांगल्या खिडक्‍या, पंखे आदीमुळे व्यवस्थित प्रवास करता येणार आहे, अशी भावना प्रवासी वैशाली भोसले यांनी व्यक्‍त केली.
डेक्‍कन एक्‍स्प्रेस चालविण्याच्या कामाचा आनंद आहे. पुणे विभागात मागील 8 वर्षांपासून कार्यरत आहे. महिला सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना आणि सहकार्यामुळे उत्तमरित्या काम करू शकतो. पुणे विभागात बारामती, पनवेल आणि सातारा मार्गांवर काम केले आहे.
– श्रद्धा तांबे, लोको पायलट
प्रवाशांशी संवाद साधला असता, डेक्‍कन एक्‍स्प्रेसच्या नव्या एलएचबी कोचबाबत प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. महिला सशक्‍तीकरण आठवड्याचे औचित्य साधत, डेक्‍कन एक्‍स्प्रेसची धुरा महिलांकडे सोपवली आहे. यासह पुणे स्थानकाच्या अनेक विभागांची जबाबदारी देखील महिलांकडे देण्यात आली आहे. 10 मार्चपर्यंत महिला दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
– रेणू शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक


 

Previous Post

एकूण उद्दिष्टापैकी 80 टक्‍के साखर निर्यातीचा अंदाज

Next Post

शेलवड येथे पुन्हा म्हशींची चोरी ; गावकऱ्यांमध्ये खळबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेलवड येथे पुन्हा म्हशींची चोरी ; गावकऱ्यांमध्ये खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी
1xbet russia

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon