बोदवड (प्रतिनिधी) – तालुक्यातील शेलवड येथे दोन म्हैशी चोरी झाल्याची घटना घडली असून सतिश रामदास चौधरी (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.११ रोजी रात्री ११ वाजेपासून ते दिनांक १२/०२/२०२० रोजी सकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान शेलवड गावातील जामनेर रोड वरील तारेच्या कंपाऊंड मध्ये असलेल्या गोठ्यामधून३० हजार रुपये किमतीची गावरान जातीची काळसर भु-या रंगाची गोल शिंग लांब शेपूट असलेली एक म्हैस व ३०००० रुपये किमतीची जाफराबाद जातीची काळ्या रंगाची शिंग तुटलेले आखूड अंगाची अशा दोन म्हैशी कोणीतरी अन्ह्यात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या आहे.
याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अन्ह्यात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक उद्दल चौहान करीत आहेत.