पाचोरा तालुक्यातील वडगाव येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडगाव टेक येथून वडगाव खुर्दकडे जात असताना त्याची दुचाकी पाट बंधाऱ्याच्या पुलावरून घसरली. त्यात दुचाकीचालक जागीच ठार झाला आहे. ही घटना आज शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
प्रवीण वामन पाटील (वय ४५, रा. वडगाव टेक, ता. पाचोरा) असे मयताचे नाव आहे. मोटरसायकल पुलावरून घसरल्याने झालेल्या अपघातात प्रवीण पाटील यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने ते जागीच ठार झाले आहे. त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मयत घोषित करण्यात आले. त्याच्या परिवारात वयोवृद्ध आई, पत्नी,२ मुली, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात नोंदणीचे काम सुरू होते. घटनेमुळे वडगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे.