• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल पोलीस ठाण्यात होते कार्यरत

यावल  ( प्रतिनिधी ) – येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अत्यंत मनमिळावू कर्मचारी भरत विठ्ठल कोळी (वय ३८) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावल-किनगाव रस्त्यावरील हॉटेल मनमंदिराजवळ एका भरधाव क्रूझरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोळी यांची सोमवारी जळगाव येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री भरत कोळी हे आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ . सिजी.२८१३) यावल येथून किनगावमार्गे आपल्या राहत्या गावी विदगाव येथे जात होते. हॉटेल मनमंदिराजवळून जात असताना मागून आलेल्या भरधाव क्रूझरने (क्र. एमएच २९ बीसी ५४८७) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत कोळी हे गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी झुंज संपली. या अपघात प्रकरणी प्रवीण कोळी यांच्या फिर्यादीवरून क्रूझर चालक दीपक प्रकाश सपकाळे (रा.आडगाव) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करत आहेत.

भरत कोळी यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विदगाव (ता. यावल) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जळगाव डीवायएसपी नितीन गणापुरे, फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, यावल निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि जळगाव तालुका निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा मुख्यालयातील मानवंदना पथकाने हवेत रायफलच्या फैरी झाडून त्यांना अखेरची सलामी दिली.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

Next Post

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ
1xbet russia

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon