• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहार ता. पाचोरा येथील एका घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जलीम अहमद सुभान गनी शेख (वय ५०, रा. लोहार, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांच्या राहत्या घरात २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.१५ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.
चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये २१ हजार रुपये किमतीचा १४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार, १५ हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा साधा हार, २ हजार रुपये किमतीची २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तसेच सुमारे १ हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे, चांदीची चैन, चांदीची बांगडी व चांदीची अंगठी यांचा समावेश आहे.
याशिवाय शेतीमाल विक्रीतून ठेवलेली १ लाख २४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ज्यामध्ये ५०० रुपयांच्या चलनी नोटांचा समावेश आहे, अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या घरातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चोरट्याचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

Tags: #crime #pachora #pimpalgaonpolice
Previous Post

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

Next Post

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
खान्देश

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 26, 2026
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!