विधानसभा मतदारसंघात महायुतीची झाली सभा
जळगाव (प्रतिनिधी) : सध्या जळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पाचोरा तालुक्यात स्मिता वाघ यांच्या प्रचारामध्ये आघाडी दिसून येत आहे. भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी पाचोरा-भडगाव मतदार संघामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व आरपीआय आठवले गट नेत्यांची एकजूट दिसून येत आहे. आ. किशोर पाटील, अमोल शिंदे, दिलीप वाघ व सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या सभेद्वारे विरोधकांवर कडाडून टीकास्त्र सोडत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा प्रचार जोरदार प्रचार सुरु आहे. अनेक गावांमध्ये याबाबत सर्वेक्षण केले असता ‘कमळ’ हे चिन्ह मोठ्या संख्येने पोचले असल्याचेही चित्र दिसून आले आहे. याचबरोबर पाचोरा तालुक्यातील भाजपाचे नेते अमोल शिंदे हे देखील बुधवारी प्रचार सभेमध्ये दिसून आले. मतदारसंघनिहाय प्रत्येक घटक पक्षाने भाजपच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी ताकद लावली पाहिजे. हे वरिष्ठ नेत्यांचे आदेश आहेत. त्यानुसार भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटचे नेते स्मिता वाघ यांच्या प्रचारात कामाला लागले आहेत.
नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात आमदार किशोर पाटील, अमोल शिंदे यांच्यासह भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आ. दिलीप वाघ यांची उपस्थिती दिसून आली. या ठिकाणी उमेदवार स्मिता वाघ यांना बुथनिहाय अधिक मते मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी अजून जोमाने कामाला लागावे असे आवाहन या नेत्यांनी केले. स्मिता वाघ यांची हस्तपत्रके मतदारसंघातील गावागावात कार्यकर्त्यांनी पोहोचवावी असेही आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले. एकंदरीतच पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रामध्ये स्मिता वाघ त्यांच्या प्रचारामध्ये ताकद आणखी वाढली तर त्यांना फायदा होणार आहे.