जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा बाजार समितीमध्ये नविन हंगामाची जवळपास ५०० क्विंटलची सोयाबीन पिकाची आवक झालेली आहे. त्यास ४६३५/- प्रति क्विंटल रुपये प्रमाणे भाव मिळाला आहे. आजच्या परिस्थितीत पाहायला गेले तर परिस्थितीनुरूप सोयाबीन ह्या शेतीमालाला चांगलाच विक्रमी दर मिळाला आहे, अशी माहिती पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील, सचिव बोरुडे यांनी दिली आहे.
सोयाबीन शेतीमाल खरेदीदार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले.