मुंबई (वृत्तसंस्था) – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वतः किरीट सोमय्या यांनीच याविषयी माहिती दिली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये सोमय्या म्हणत आहेत की, ‘पोलिसांनी मला निवासी परिसर/ कार्यालयातून निलमनगर मुलुंड येथून अटक केली आहे, आता मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेले आहे,’किरीट सोमय्या यांनी त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे कारणही सांगितले आहे. सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. याच तरुणाला भेटालया किरीट सोमय्या जात असताना त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती किरीच सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. किरीट सोमय्या ट्विट करत म्हणाले की, . ‘मुंबई पोलिसांनी मला माझ्या निवासी आवारात (निलमनगर मुलुंड) ताब्यात घेतलं आणि काल जितेंद्र आव्हाड यांनी ज्या अनंत करमुसे या तरुणाला मारहाण केली होती त्याच्या घरी जाण्यापासून अडवलं. मी आज सकाळी अनंत करमुसे याच्या घरी जाणार होतो’ असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.