अमळनेर तालुका प्रतिनिधी,
तालुक्यातील मुंगसे या गावातील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे. ही महिला जळगाव जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल झाली होती. मात्र आज तिचा रिपोर्ट आल्यावर ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. पुढील कार्यवाही साठी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग झाली असून तसेच मुंगसे गावाच्या आजूबाजूचे गाव(रुंधाटी, सावखेडा,दापोरी खुर्द) सील करण्यात आली आहेत. त्या चारही गावांमध्ये रात्रीच फवारणी झाली असून 19 रोजी सुमारे 8 वैद्यकीय पथक जाऊन त्या गावांमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान या बाबत संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्याला जिल्हा प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आले असून तीन दिवस तालुक्यातील सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकानीं घराबाहेर नपडण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.