• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ नाशिकमध्ये तयार होत आहेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2020
in महाराष्ट्र
0

नाशिक (वृत्तसंस्था) – कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी सांभाळणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षाकवच असणाऱ्या ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ अर्थात पीपीई किट्स सध्या नाशिकमध्ये तयार होत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गवळी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकमधील अमोल चौधरी या युवा उद्योजकाला पीपीई किट्स तयार करण्याची परवानगी दिली असून येथे दररोज दोन हजार किट्स निर्मिती कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यसाठी केली जात आहे. याआधी अमोल चौधरी हे विविध प्रकारचे गणवेश, सैन्याला लागणारे वैशिष्टपूर्ण ड्रेस, भारतीय सैन्यदलाला लागणारे बुलेटप्रूफ जॅकेट आतापर्यंत तयार करत होते. मात्र कोरोना आजाराच्या संकट काळात रुग्ण सेवा देणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स” (पीपीई किट्स) परिधान करणे आवश्यकता आहे, याबाबत सावधानता बाळगली नाही तर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनाच या संसर्गाचा मोठा धोका संभवतो. सद्यस्थितीत राज्यासह देशात अशा किटचा मोठ्या प्रमाणात वर तुटवडा भासत आहे, एका किटची किंमत साधारण पंधराशे ते सतराशे रुपये आहे. डॉक्टरांना दिवसभरात किमान दोन पीपीई किट्स वापरावी लागतात, अनेक डॉक्टर्स स्वखर्चाने हे किट्स खरेदी करण्यास तयार आहेत. देशात मोठ्या प्रमाणात पीपीई कीट्सची आवश्यकता असल्याचे चित्र आहे. मात्र अमोल चौधरी या उद्योजकाने सर्व प्रकारची वाहतूक आणि मुंबई-पुण्याचा प्रवासही पूर्णपणे बंद असताना त्यांनी यासाठी लागणारा कच्चामाल सामुग्री आणि कापड शोधून काढले. कमी किमतीत संपूर्ण भारतीय बनावटीचा पीपीई किट्स नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होत आहे. देशातील काही राज्यांनी तसेच केंद्र सरकारने ही पीपीई किट्स पुरवठा संदर्भात चौकशी केल्याची माहिती उद्योजक अमोल चौधरी यांनी दिली आहे. राज्य शासनाने नाशिकचे अमोल चौधरी यांना पीपीई किट्स निर्मितीची परवानगी दिली असून त्यांनी आपल्या अंबड येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सरकारच्या नियमानुसार पीपीई किट्स निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे किट तयार करतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय, तांत्रिक निकषांची विशेष काळजी घेतली जात आहे. या पीपीई किट्स निर्मिती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी कामगारांना अत्यावश्यक वाहतुकीचा परवाना दिला असून अवघ्या सातशे पन्नास रुपये किमतीत पीपीई किट्स निर्मिती केली जात आहे.
दृष्टिक्षेपात ‘डॉक्टरांसाठी कोरोना सुरक्षा कवच’- कोरोना पासून डॉक्टर्स व आरोग्य कर्मींच्या बचावासाठी नाशिकचे युवा उद्योजक अमोल चौधरी यांनी सुरू केली पीपीई किट्स ची निर्मिती, महाराष्ट्र शासनाच्या परवानगीमुळे रोज होत आहे 2000 किट्स ची निर्मिती, सद्यस्थितीत राज्यासह, देशात अशा किट्स चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा, पंधराशे ते सतराशे रूपयांचे पीपीई किट्स अवघ्या 750/- रूपयांत निर्मिती, लॉकडाउन च्या परिस्थितीत ही कच्चा माल शोधून निरंतरपणे सुरू आहे निर्मिती, विशेष म्हणजे किट तयार करताना त्याच्या निर्मितीच्या तांत्रिक वैद्यकीय निकषांची घेतली जात आहे काळजी, लॉकडाऊनच्या कालावधीत उत्पादन अखंड चालू रहावे यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, परिवहन विभाग यांनीही दिल्या अत्यावश्यक म्हणून मान्यता.


 

 

Previous Post

अमळनेर मुंगसे या गावातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने तालुका तीन दिवस कडकडित बंद

Next Post

आठ दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये करा – अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आठ दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये करा - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon