शिरसोली (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे एका 34 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ( 30 मार्च ) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
शिरसोली प्र.न. येथील रहिवाशी मुकेश निंबा पाटील (वय 34) याने आज 9 वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना दारूच्या नशेत स्वतः च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुकेश हा रिक्षा चालावून व हात मजुरी करायचा. त्याने गळफास घेतल्याने पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, आई, पत्नी असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोद करण्यात आली आहे. मुकेश याने आत्महत्या केली त्यावेळी त्याची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती आणि पत्नी माहेरी गेलेली होती असेही सांगण्यात आले