जिल्हा रुग्णालयातील आत्तापर्यंत ७१ जणांना उपचारार्थ दाखल केले असून त्यातील ४१ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर २७ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहे.
जळगाव – कोरोना विषाणूचे पडसाद आता जिल्ह्यात जाणवू लागले आहे. दोन दिवसांपुर्वीच एक रूग्णाला कारोना संकमित असल्याने जिल्हा खळबळीने जागा झाला होता. दिवसंदिवस कोरोना संशयितांची आकडा हा वाढत आहे. दरम्यान दोन दिवसांपुर्वी आढळून आलेल्या रूग्णामुळे जळगावातील मेहरूण परीसर बंदी करण्यात आली आहे. तर त्याच परिसरात निर्जंतूक फवारणी देखील महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. मात्र नागरीकांच्या मनात अजून भिती कायम आहे.
आज जिल्हा वैद्यकिय महाविद्यालया कोरोनाचे लक्षणानुसार तीन रूग्णांना कोरोना कक्षात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ७१ जणांची रिपोर्ट नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यातील ४१ जणांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले तर २७ जणांचे मेडीकल रिपोर्ट प्रलंबित असून १ रिपोर्ट संक्रमित तर दोन रिपोर्ट रिजेक्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाचे आधिष्ठात डॉ.खैरे यांनी सांगितले.