जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मुक्त झालेल्या बंद्यांना घरी सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली
जळगाव ( प्रतिनिधी ) जिल्हा कारागृहातील एकूण 41 बंदी यांना आज (30 मार्च रोजी ) जामिनावर मुक्त करण्यात आले. यापैकी 28 बंदी यांना 45 दिवसाच्या अंतरिम जामीनावर मुक्त करण्यात आले त्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात केल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी या मुक्त झालेल्या बंद्यांना घरी सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली होती.
याशिवाय नियमित जामीन झालेले 13 बंदी यांनादेखील कारागृहातून मुक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या धोरणात्मक भूमिकेनुसार कोरोना प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी बैठक घेऊन जिल्हा कारागृहाला दिलेल्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कारागृहात परिसर स्वच्छतेसाठी आज (30 मार्च रोजी ) साफसफाई व सॅनिटायझर फवारणी बंदी बॅरेक व आतील परिसरात करण्यात आली याबाबत जेल प्रशासन याबाबत काळजी घेत आहे.असे यावेळी कारागृहाचे प्रभारी श्री गोसावी यांनी सांगितले