धरणगावला शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मानराज पार्कजवळ दुचाकीस्वारास अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री ८ वाजेनंतर घडली आहे. दरम्यान, मयत तरुण हा धरणगाव येथील वकील असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रवाना करण्यात आला आहे.
जळगावात विधीक्षेत्रात कार्यरत असणारे अॅड.विवेक पाटील यांचा आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील मानराजपार्क जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अॅड.विवेक पाटील हे जळगावहून आपले कामकाज करून धरणगाव परत जात असताना मानराजपार्क जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. अपघात झाल्यानंतर नगरसेवक अमर जैन यांनी घटनास्थळ गाठत शववाहिका मागवली. तसेच वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
अपघातात मयत तरुण तब्बल तास भर महामार्गावर पडून असल्याचे विदारक चित्र आज पहावयास मिळाले. जळगाव ते धरणगाव दुचाकीने अपडाऊन करुन ऍड.विवेक पाटील यांचे कामकाज सुरु असते. आज नेहमीप्रमाणे ते, जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे आज उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते, त्यांच्या दुचाकीने घराकडे निघाले असतांना राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्क जवळ कार शोरुमच्या समोरच ॲड.पाटिल यांच्या दुचाकीला समोरुन सुसाट वेगात येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक देत चिरडून पसार झाला.
या अपघातात ॲड.विवेक पाटिल यांचा जागीच मृत्यु ओढवला. मयत ॲड.विवेक पाटिल यांच्या पश्चात सहा महिन्याची मुलगी, पत्नी आणि आई असा परिवार आहे.