जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिवाजीनगर भागात रहिवासी असलेल्या माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश अशोक सपकाळे यांचा रात्री 11:30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकाचे कर्मचारी माहिती घेत आहे.

राकेश अशोक सपकाळे (वय 28) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अज्ञात लोकांनी कुठल्यातरी कारणावरून वाद घालून धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती मिळाली. त्याला गंभीर अवस्थेत पारखनगरातील ओम क्रिटिकल केअर सेंटर मध्ये उपचारासाठी आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.
